
बीड : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगीक छळ प्रकरणातील कोठडीतील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांची तपास अधिकाऱ्यांनी तब्बल १० तास चौकशी केली. या प्रकरणाचा तपास आता पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. या दोघांच्या मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम सुरु असून इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र देण्यात आले आहे.