
बीड : डोंगराळ गाव असल्याने सिंचनाची साधने नाहीत. त्यामुळे मुरमाड जमीन आणि शेतीवरच गुजराण. कष्ट करून आई-वडिलांनी मुलांना शिकवले आणि मुलांनीही पालकांच्या कष्टाची जाण ठेवत चीज केले. वरवटी (ता. अंबाजोगाई) या छोट्याशा गावातील १० जणांची महावितरण व महापारेषणमध्ये विद्युत सहायक आणि विद्युत तंत्रज्ञ पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे यात एका दांपत्याचाही समावेश आहे. या तरुणांच्या यशाची ऊर्जा इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.