Marathwada Farmer : गळ्याला फास, वारसावर कर्ज, मदतीला दिरंगाई; शेतकऱ्यांच भयावह वास्तव, पाच महिन्यांत १०६ जणांनी संपविले जीवन
Agricultural Distress : बीड जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यान १०६ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. तरीही फक्त ४८ कुटुंबांना आतापर्यंत सरकारी मदत मिळाली असून उर्वरित अजूनही प्रतीक्षेत आहेत.
बीड : कर्जबाजारीपणामुळे शेतकरी गळ्याला फास घेतो पण त्याच्यानंतर त्याची मुलं किंवा पत्नीच्या नावावर कर्ज कायमच राहते. मायबाप सरकारही एवढे असंवेदनशील आहे की कुटुंबीयांना मदत द्यायला पाच महिने लावते.