esakal | अबब! रुग्णवाहिकेत जन्मली ७९० बालके

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

विविध 13 प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

अबब! रुग्णवाहिकेत जन्मली ७९० बालके
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबादः शासनाच्या 108 रुग्णवाहिका रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणुन ओळखल्या जात आहेतच, पण त्यामध्ये प्रसुतीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. 2014 पासुन जिल्ह्यामध्ये 790 बालकांनी रुग्णवाहिकेमध्ये जन्म घेतल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. शिवाय 23 हजार गर्भवतींना रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी या रुग्णवाहिकेची मदत झाली आहे.

जानेवारी 2014 ते जानेवारी 2020 पर्यंत जिल्ह्यात सुमारे 96 हजार 872 इतक्या रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे अधिक सोप झाल्याचे दिसुन येत आहे. अपघातग्रस्तांना तातडीने आवश्यक प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचल्याचे पाहयला मिळत आहे.

पबजी खेळता खेळता पोरगा कुठे गेला...

विविध 13 प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

मागील सहा वर्षांत सुमारे 23 हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले. या सेवेत जिल्ह्यामध्ये 15 रुग्णवाहिका सुरु आहेत. अपघाताचा आकडा पाहिला तर जवळपास साडेसात हजाराच्या जवळपास गेल्याचे दिसुन येत आहे.

महाशिवरात्रीला कोणत्या राशीच्या लोकांनी काय वाहावे...

गेल्या सहा वर्षाची आकडेवारी पाहिली तर 2014 मध्ये चार हजार रुग्णांना रुग्णवाहिकेचा उपयोग झाला, दुसऱ्या वर्षी हा आकडा वाढुन सात हजारावर पोहचला, त्यानंतरच्या वर्षी 12 हजार 624, तर 2017 मध्ये जवळपास16 हजार रुग्णांना या सेवेचा लाभ मिळाला होता. 2018 मध्ये तीस हजार, तर 2019मध्ये 25 हजार रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन उपचाराची सोय मिळाल्याचे आकडेवारी सांगते.

2020 मध्ये जानेवारी एक हजार 296 इतके रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमाचा उपयोग झाल्याचे चित्र आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या खास गर्भवतीसाठी 102 ची सेवा असतानाही 108 ची सेवा घेणाऱ्यांची संख्याही तेवढीच असल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 790 गर्भवतीची प्रसुती ही रुग्णवाहिकेतच झाल्याने या सेवेचा मोठा उपयोग होत असल्याचे पाहयला मिळत आहे.

सध्या काही ठिकाणी मनुष्यबळाची वानवा जाणवत असली तरी सेवेच्या बाबतीत कुठेही तडजोड केली जात नाही. सध्या आमच्याकडे असलेल्या सर्व डॉक्टरांनी अधिकाधिक वेळ देऊन मनुष्यबळाचा प्रश्न सुटेपर्यंत सेवा देण्यास सूरुवात केली आहे. 
- डॉ.प्रकाश शेलार, जिल्हा समन्वयक, रुग्णवाहिका