esakal | Coronavirus : उस्मानाबादमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांना बाधा, आज ११ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

 11 new Covid-19 cases in Osmanabad district

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंगळवार धक्कादायक ठरला  आहे. जिल्ह्यातील ५५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाली आहेत. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.

Coronavirus : उस्मानाबादमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांना बाधा, आज ११ रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद  : जिल्ह्यात एकाच दिवशी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश असून ते सर्वजण उस्मानाबाद शहरातील आहेत. तर अन्य तीन कळंब तालुक्यातील आहेत. यामध्ये शिराढोणचा एक तर कळंब शहरातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. व्ही. गलांडे यांनी दिली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंगळवार धक्कादायक ठरला  आहे. जिल्ह्यातील ५५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाली आहेत. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. तर ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाची चाचणी पुन्हा घेतली जाणार आहे.  उस्मानाबाद शहरातील आठहीजण एकाच कुटुंबातील असून उस्मानपुरा भागातील आहेत. यापूर्वी रुग्णाच्या संपर्कात आलेले हे सर्वजण आहेत तर कळंब शहरातील दोघेजणही  यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. शिराढोन येथील एक रुगणही यापूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेला आहे.
 
'त्या' रुग्णाने डोकेदुखी वाढवली 
नळदुर्ग शहरातून एक रुग्ण उपचार घेण्यासाठी काही दिवसापूर्वी उस्मानाबाद शहरात आला होता. त्याने शहरात येऊन येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.  त्यानंतर तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली व तो पॉझिटिव  आला. शहरातील उस्मानपुरा भागात तो एका नातेवाईकाकडे राहिला होता. त्या नातेवाईकाच्या कुटुंबातील आठ जण आज पॉझिटिव आले आहेत. तर दोन खाजगी रुग्णालयातील  काही जणांना क्वारणटाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आठही जण एकाच कुटुंबातील आहेत.

अरे वाह! आता कोविड केंद्रामध्ये 'या' अनोख्या तंत्रज्ञानाचा होणार वापर

पालिकेचे अनेक कर्मचारी, शिक्षक शहरातील घरोघरी जाऊन बाहेरून  आलेल्यांचा शोध घेतात. उस्मानपुरातील 'त्या' नातेवाइकांच्या कुटुंबाच्या घरीही काही शिक्षक गेले होते. मात्र आमच्याकडे कोणीही पाहुणा आला नाही अशी चुकीची माहिती दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

शहरात यापूर्वी आतापर्यंत दहा रुग्ण आढळून आले आहे. तर आजच्या एका दिवसांतील ८ पॉझिटिवमुळे शहरातील  रुग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात चांगलाच धोका वाढला असल्यास चित्र दिसत आहे. एकाच कुटुंबातील आठ व्यक्ती पॉझिटिव आल्याने हे आठ जण अनेकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

loading image
go to top