परभणी : हजारो हेक्टरवरील पिके पुराखाली ; 11 गावांचा संपर्क तुटला

भास्कर लांडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सोमवारी पहाटेपासून घास गळाटी, लेंडी या ​नद्यांना पुर आल्याने पाणी पात्र सोडून 200 ते 300 मीटर परिसरातून वाहत आहे. यामुळे पालम तालुक्यातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे.

परभणी : खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास गळाटी, लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे हिरावून नेला. सोमवारी (ता. 2) पहाटेपासून या नद्याचे पाणी पात्र सोडून 200 ते 300 मीटर परिसरातून वाहत असल्याने पालम तालुक्यातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे.

बालाघाट डोंगर रांगेत सलग तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने गळाटी, लेंडी नद्यांच्या पूर आला. तर मासोळी, palam पलीकडील नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सोमवारी पहाटेपासून नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले. त्याचा फटका नदी पात्राजवळील दोन्ही बाजूच्या पिकांना बसला.

दरम्यान, पिके फुल व फलधारणा अवस्थेत असताना पुराणे वाया गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याहीपेक्षा पालम तालुक्यातील 11 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात आरखेड, सोमेश्वर, घोडा, पुयनी, आडगाव, गणेशवाडी सायळ, उमरथडी, खूरलेवाडी, धनेवाडी आदी गावांचा संपर्क पालमशी तुटला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 villages were damaged due to floods in Parbhani