Ashadi Wari 2025: सुरू होता वारी, कागदावर उमटे ‘शब्द वारी’; परभणीतील शिक्षकाचा ११ वर्षांपासून उपक्रम, लिहिले १ हजार ४१९ अभंग
Pandharpur Wari : गेल्या अकरा वर्षांपासून शिक्षक दिलीप चारठाणकर दरवर्षी आषाढी वारीत रोज एक अभंग लिहित आहेत. त्यांचे १४१९ अभंग विठ्ठल भक्तीने ओथंबलेले आहेत.
परभणी : वारी सुरू होताच मनातील भाव ते कागदावर उमटवितात. गेल्या अकरा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. या काळात त्यांनी सुमारे १ हजार ४१९ अभंग लिहिले आहेत. दिलीप चारठाणकर असे त्यांचे नाव आहे. ते शिक्षक आहेत.