औसा - औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली औसा पोलिसांच्या पथकाने शहरातील फुले नगर येथे बुधवारी (ता. १९) रात्री छापा मारून एकशे सोळा किलो गांजासह एक स्कॉर्पिओ गाडी, दोन मोबाईल असा पंधरा लाख एक्याऐंशी हजारांचा मुद्दे माल जप्त केला. या छप्यामध्ये परराज्यातील दोन इसमाना पोलिसांनी अटक केली असून औशातील एक संशयित फरार झाला आहे.
या बाबत औसा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांना बुधवार (ता. १९) एका गुप्त माहितीद्वारे महात्मा फुलेनगर, औसा येथे एक व्यक्ती त्याचे साथीदारसह त्याच्या राहत्या घरामध्ये स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
सदरची माहिती वरीष्ठांना कळवून शासकीय पंचासह महात्मा फुलेनगर,औसा येथे पोलीस निरीक्षक श्री. रेजितवाड यांच्या पथकाने सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी एक संशयीत स्कार्पीओ वाहन क्रमांक ए.पी. २० एन. ३६३७ दिसुन आली.
त्यामध्ये दोन इसम रमेश आर यादाईह, (वय-४५ वर्ष) रा. ओबलपुर, जाफरगड वरगंल, तेलंगणा. व निबास लक्ष्मीकांत बडइ, वय ५४ वर्ष रा. एमपीव्ही ८२ मलकागिरी, मलाभरम ओडिसा.असे आढळून आले सदर वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता वाहनामध्ये गांजाचे प्लॉस्टीक गुंडाळलेली पॉकीटे व मोबाईल मिळाले.
त्या दोघाकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गांजा परशुराम देविदास कांबळे, रा. फुलेनगर, औसा. याने आमच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. त्यावरून परशुराम कांबळे यांचे घराची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या घरातपण पाच प्लॉॉस्टीकच्या गोण्या मध्ये लाहन मोठ्या आकाराचे प्लॉस्टीकने पॅकिंग केलेले पॉकीटे मिळाली.
गाडीमध्ये व परशुराम कांबळे यांच्या घरात पोलिसांना गांजाची ६७ पॉकिटे सापडली. या ओल्या व सुक्या गांजाचे वजन केले असता ११६.१४ किलो ग्राम वजन भरले. गुन्ह्यात वापरलेली एक सिल्व्हर रंगाची स्कॉर्पिओ गाडी किंमत अंदाजे चार लाख व दोन मोबाइल अंदाजे किंमत वीस हजार असा १५ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दोन परराज्यातील संशयितांना अटक केली असून औशातील संशयित आरोपी परशुराम कांबळे हा फरार झाला आहे. औसा पोलिसांकडून फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे. औसा पोलिसात या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, सहायकफौजदार. संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गुटे,मुबाजोददीन सय्यद, मोतीराम घुले, भरत भुरे, गोविंद पाटील, बालीका सरवदे यांनी पार पाडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.