सदर अपघात जाफराबाद तालुक्याच्या हद्दीत झाला असल्याने जाफराबाद आगारातील तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जाफराबाद : चिखली आगाराची (Chikhali Bus) जाफराबाद ते चिखली बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत असताना आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोळेगावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून अपघात झाला. यात 12 प्रवासी जखमी झाले आहेत.