
नांदेड : राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत १२६ महाविद्यालयांनी दत्तक घेतलेल्या गावांत सात दिवसीय विशेष वार्षिक निवासी शिबिरांना सुरवात झाली आहे. सध्या ५१ हून अधिक शिबिरे सुरू असून, ३१ शिबिरे पूर्ण झाली आहेत. १६ हजार ८०० एनएसएस स्वयंसेवकांना १२६ गावांतून कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांच्या कल्पनेतून दत्तक गावामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एन.ई.पी.) स्कूल कनेक्ट २.० अंतर्गत एन.ई.पी. विषयी जनजागृती रॅली, एन.ई.पी. व्याख्यान व एन.ई.पी. चावडी वाचन.यशस्वीरित्या करण्यात येत आहे.