औंढा तालुक्‍यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे १४ कोटी ९७ लाखाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

राजेश दारव्हेकर
Friday, 20 November 2020

दरम्यान यावर्षी  अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे पिकाचे क्षेत्र बाधित झाले होते त्याचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याचे आदेश सर्व बँकांना पत्राद्वारे तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी दिले. 

हिंगोली -  औंढा नागनाथ तालुक्यात जून ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश बँक अधिकाऱ्यांना तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी पत्राद्वारे दिले.

दरम्यान यावर्षी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे पिकाचे क्षेत्र बाधित झाले होते त्याचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याचे आदेश धनादेश देऊन सर्व बँकांना पत्राद्वारे तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी दिले यात मयत खातेदाराच्या अनुदान वारसा प्रमाणपत्रा आधारे वारसाला अदा करण्यात यावे तर संयुक्त खातेदारांची अनुदान रक्कम सहमती पत्रा प्रमाणे आदा करण्यात यावी असेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा -  अनधिकृत होर्डिंग्ज झळकणारे परभणी शहर
दरम्यान तालुक्यातील गावच्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टी अनुदानाच्या रक्कमेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे. या गावांमध्ये औंढा नागनाथ, सिद्धेश्वर, सावंगी, अंजनवाडा, पेरजाबाद, भोसी, सावळी बहीणाराव, ब्राह्मणवाडा, गोळेगाव, ढेगज,बेरूळा, माळकोटा, बुद्रूक, नागझरी, नांदखेडा, वसई, दुरचूना, सुकापुर, गलांडी, वाळकी, वगरवाडी तांडा, वगरवाडी, हिवरखेडा, चिमेगाव, अंजनवाडा तांडा, धार, देवळा, तुर्क पिंपरी, भगवा, पाझरतांडा, गांगलवाडी, वडचूना, सुरवाडी, सावळी तांडा,लाडपिंपरी, जोडपिपरी, भोगला, असोला तर्फे औंढा,पारडी सावळी, आमदरी,  रामेश्वर, जलालदाभा, केळी, मुर्तिजापूर सावंगी, जडगाव, दुघाळा, भोसी, बोरजा, कंजारा, देवळा, कोडसी, येळेगाव सोळंके, मेथा, असोदा, नांदखेडा, कामठा, पूर,सुरवाडी, धारखेडा,टेभूर्दरा, सुरेगाव, गवळेवाडी, सारंगवाडी, हिवरा,सावरखेडा, पांगरा तर्फे लाख, तामटी तांडा, गोळेगाव, रांजाळा, म्हाळजगाव,लाख, काकडधाबा,देवाळा तर्फे लाख, आदींसह तालुक्यातील ८४ गावांच्या बत्तीस हजार ९६८ शेतकऱ्यांना २९  हजार ७७८. ९४ बाधित क्षेत्रावरील ४२  बँक शाखेद्वारे १४  कोटी ९७  लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

 

संपादन -प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 crore 97 lakh grant for excess rainfall in Aundha taluka will be credited to farmers' accounts hingoli news