Jalna Accident : बदनापूरमध्ये कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीवरील १४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
Accident News : बदनापूर येथे वडिलांसोबत दुचाकीवरून जात असलेल्या १४ वर्षीय अर्पिता गरुड याला कंटेनरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
बदनापूर : वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या मुलीचा कंटेनरखाली सापडून जागीच मृत्यू झाला. जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर येथील पोलिस ठाण्यासमोर बुधवारी (ता. २८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.