Chakur Accident : भरधाव वेगातील एसटी पलटी होऊन पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी

ST Bus Overturn: मोटारसायकलस्वाराला वाचविण्यात भरधाव वेगातील एसटी पलटी झाल्यामुळे जवळपास पंधरा ते वीस जण गंभीर जखमी.
Chakur Accident
ST Bus Overturnsakal
Updated on

चाकूर - लातूर - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी (ता. चाकूर) येथे मोटारसायकलस्वाराला वाचविण्यात भरधाव वेगातील एसटी पलटी झाल्यामुळे जवळपास पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.३) दुपारी १.४० वाजता घडली आहे, जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

अहमदपुर आगाराची अहमदपुर - लातूर ही एसटी बस चाकूर येथून प्रवाशी घेऊन लातूरच्या दिशेने निघाली असता नांदगावपाटी जवळ एक मोटारसायकलस्वार अचनाकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचे लक्षात येताच पाठीमागून येणाऱ्या एम. एच. २० बी. एल. १६१३ क्रमांकाची एसटी चालकाने मोटारसायकलस्वाराला वाचविण्यासाठी एसटी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यामुळे एसटी पलटी झाला.

यात एसटीतील अनेक प्रवाशांना गंभीर मार लागला आहे, काही प्रवाशांची हात व बोटे तुटुन घटनास्थळी पडली आहेत. अपघाताची माहिती कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम, उपनिरीक्षक पंकज निळकंठे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

जखमींना रुग्णावाहिकेतून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, वाहतुक अधिकारी संदीप पडवळ, आगारप्रमुख बाळासाहेब राठोड, अमर पाटील, वाहतुक नियंत्रक व्यंकट बिराजदार यांनी भेट देऊन पाहणी केली.

एसटीमध्ये ४२ प्रवाशी होते यातील पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अपघातस्थळापासून अवघ्या पाचशे फुटावर राष्ट्रीय महामार्गावरील टोलप्लाझा असून यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात कसा झाला चित्रण झाले आहे.

महामार्ग पोलिस एक घंट्याने घटनास्थळी

लातूर जिल्ह्यासाठी महामार्ग पोलिसांचे ठाणे घरणी येथे आहे, अपघातस्थळापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर हे ठाणे असतानाही महामार्गाचा एकही कर्मचारी जखमींना वाचविण्यासाठी किंवा रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी पोहचला नव्हता.

दररोज याच रस्त्यावर थांबून वाहनांची तपासणी करून त्यांना दंड लावण्यासाठी संक्रीय असणारे महामार्गाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहचले नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com