राज्यातले अडीच लाख शेतकरी वाऱ्यावर; एकट्या मराठवाड्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांवर अन्याय

केंद्र शासनाने या वर्षी राज्य शासनाला १४ लाख १३ हजार २७० टन इतके सोयाबीन खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. तरीही शासनाने ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत मुदत संपेपर्यंत केवळ ११ लाख २१ हजार ३८५ टनच सोयाबीनची खरेदी केली आहे.
राज्यातले अडीच लाख शेतकरी वाऱ्यावर; एकट्या मराठवाड्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांवर अन्याय
Updated on

लातूर: बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडल्याने शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरु केले. पण रडत पडत ही केंद्रे साडेचार महिने चालविण्यात आली. कधी बारदाने नाही म्हणून केंद्रे बंद राहिली तर कधी धिम्या गतीने खरेदी सुरु राहिल्याने आठ-आठ दिवस वाहनांच्या रांगा लागल्या. असे करीत शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. यात नोंदणी करुनही राज्यात अडीच लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही. यात मराठवाड्यातील दीड लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने खरेदीसाठी मुदत वाढ देण्याची किंवा भाव फरक देवून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com