harit dharashiv tree plantationsakal
मराठवाडा
Umarga News : 'हरित धाराशिव' अभियनाअंतर्गत एकाच दिवशी १५ लाख रोपांची लागवड; एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
वृक्ष लागवडीसाठी सरसावले हजारो हात.
उमरगा, (जि. धाराशिव) - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 'हरित धाराशिव' अभियानांतर्गत एकाच दिवशी पंधरा लाख वृक्ष लागवडीच्या उपक्रमा अंतर्गत उमरगा, मुरुम पालिकेसह तालुक्यातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शनिवारी (ता.१९) जवळपास तीन लाख रोपांची लागवड केली.