
केज : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील स्वामी समर्थ मठ संस्थानातील पादुका प्रतिष्ठापनेला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोमवारपासून (ता. ५) पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त भजन, कीर्तन, भक्ती संगीत, प्रवचन, यज्ञाहुती अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.