esakal | हिंगोलीत ९९ ग्रामपंचातंर्गत २५९ कामावर १५०३ मजुरांकडून कामे सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरम्यान, कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जुलै अशी पाच महिने कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र त्यानंतर लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने पुन्हा ऑगस्ट पासून रोजगार हमीच्या कामांना शासनाने मुभा दिल्याने कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे मजुरांना ही दिलासा मिळाला आहे.

हिंगोलीत ९९ ग्रामपंचातंर्गत २५९ कामावर १५०३ मजुरांकडून कामे सुरू

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्‍ह्‍यात ९९  ग्रामपंचायतंर्गत महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची २५९ कामे सुरू असून या कामावर एक हजार ५०३  मजुर कामे करीत आहेत. ग्रामपंचायत मार्फत गावातच ही  कामे सुरू झाली आहेत याचा मजुरांना आधार मिळाला आहे. 

दरम्यान, कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जुलै अशी पाच महिने कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र त्यानंतर लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने पुन्हा ऑगस्ट पासून रोजगार हमीच्या कामांना शासनाने मुभा दिल्याने कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे मजुरांना ही दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्‍ह्‍यात रोहयोची कामे सुरू करून मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून देण्याच्या सुचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या होत्या. त्‍याप्रमाणे काही ग्रामपंचायतीने ही कामे हाती घेतली आहेत. आजघडीला या कामावर वीस हजार मजुरांची नोंद झाली होती. जिल्‍ह्‍यात ५६३ ग्रामपंचायतपैकी ९९ ग्रामपंचायतमध्ये महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली आहेत. 

हेही वाचा गर्भवती भावजयीशी बळजबरीने शरीरसंबंध; दीर, पती, सासूविरोधात गुन्हा दाखल -

या कामावर १ हजार  ५०३ मजुर कामावर आहेत त्यानुसार औंढा तालुक्‍यात ६४ कामे सुरू असून ३२६ मजूर  काम करीत आहेत. वसमत तालुक्‍यातील ५२ कामे सुरू असून त्यावर २६६ मजूर काम करीत आहेत.  हिंगोली तालुक्यात ५३ कामावर ३४३ मजूर काम करीत आहेत.  कळमनुरी तालुक्यात ४७ कामे सुरू असून त्यावर २९३ मजूर काम करीत आहेत. तर सेनगाव तालुक्यात ३३ कामे सूरू असून या कामावर २७५ मजूर काम करीत आहेत. ग्रामपंचायत तर्फे गावातच मजुरांच्या हाताला कामे मिळावीत यासाठी ही कामे सुरू केली आहेत. येथे कामे करताना सोशल डिस्‍टन्स पाळत ही कामे होत आहेत. येथे काम करणाऱ्या मजुंराना २०२ रुपये दिवसभराची मजुरी दिली जात आहे. आठवडाभर कामे केल्यावर या मजुराच्या बँक खात्यावर रक्‍कम जमा केली जात आहे. 

जिल्‍ह्‍यात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. लॉकडाऊन कालावधीत ही कामे बंद झाली होती तसेच रोहयोची कामे देखील बंद झाली होती. लॉकडानमध्ये शिथीलता मिळताच ही कामे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय पाणी पुरवठ्याची कामे देखील सुरू आहेत. त्‍यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुर देखील वाढली आहेत. या कामावर हिंगोली तालुक्‍यात सर्वाधिक मजूर कामावर आहेत. सार्वजनिक सिंचन विहीरीसह वयक्तिक सिंचन विहीर , घरकुल बांधकाम ,बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, बिहार पॅटर्न वृक्ष संगोपन व वृक्ष संवर्धन आदी कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image