
- धनंजय शेटे
भूम - भूम पोलिसांनी शहरातील शासकीय दूध डेअरीजवळ मोठी कारवाई करत, कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ जनावरांची सुटका केली असून, टेम्पोसह एकूण ८ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.