
कळंब (जि. धाराशिव) : वडिलांनी मोबाइलवर गेम खेळू न दिल्याचा राग आल्याने सोळावर्षीय मुलीने बुधवारी (ता. दोन) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील संभाजीनगर येथे घडली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांचे जबाब नोंदवले असून, जोगेश्वरी रामरतन निषाद (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे.