Swimming Accident : जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
Beed News : बीड शहरातील जलतरण तलावात १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. जलतरण व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची चर्चा आहे.
बीड : जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) शहरात घडली. सतीश विठ्ठल कांबळे (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.