कळमनुरी तालुक्यातील 172 स्वस्त धान्य दुकानदार देणार लाभार्थ्यांना मोफत धान्य

कोरोना संसर्गाच्या काळात राज्य व केंद्र शासनाने विविध कल्याणकारी योजनामधील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
ration card holder
ration card holder

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : आजाराच्या काळात राज्य व केंद्र शासनाने (Center governmet) विविध कल्याणकारी योजनेमधील एक लाख 62 हजार 366 लाभार्थी (Ration card holder) नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यासाठी 20 हजार 912 क्विंटल गहू व 5 पाच हजार 50 क्विंटल तांदूळ (Wheat and rice) उपलब्ध झाला असून तालुक्यातील 172 स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 172 cheap grain shopkeepers in Kalamanuri taluka will provide free foodgrains to the beneficiaries

कोरोना संसर्गाच्या काळात राज्य व केंद्र शासनाने विविध कल्याणकारी योजनामधील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाकडून एक महिन्याचे तर केंद्र शासनाकडून दोन महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्य शासनाच्या अंत्योदय योजनेमधील पाच हजार 726 लाभार्थ्यांना जानेवारीच्या वाटपा नुसार प्रति कार्ड ते 23 किलो गहू व बारा किलो तांदूळ देण्यात येणार आहे. याकरिता एक हजार 316 क्विंटल गहू व 687 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा - स्टॅलिन यांची मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.

प्राधान्य कुटुंब संख्या योजनेमध्ये एक लाख 19 हजार 573 लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. याकरिता तीन हजार 587 क्विंटल गहू व दोन हजार 390 क्विंटल तांदूळ लागणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मधून अंत्योदय योजनेमध्ये सहा हजार 235 लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. याकरिता 808 क्विंटल गहू व 539 क्विंटल तांदूळ लागणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये एक लाख 16 हजार 713 लाभार्थ्यांना वरीलप्रमाणे प्रति व्यक्ती गहू याकरिता तीन हजार 500 क्विंटल गहु व तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.

या करिता तीन हजार पाचशे एक क्विंटल गहू, दोन हजार 334 क्विंटल तांदूळ लागणार आहे. हे सर्व धान्य येथे उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. याकरिता तालुक्यातील 172 स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य उचल करुन वाटप करण्याकरिता परमिट देण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्वस्त दुकानदारांना याकामी शासनाकडून ठरवून देण्यात आलेली रक्कम दुकानदारांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पुरवठा विभागाकडून तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य उचल करण्याकरिता परमिट देण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य उचल केल्यानंतर तालुक्यातील विविध कल्याणकारी योजनेमधील लाभार्थी नागरिकांना केंद्र व राज्य शासना च्या निर्णयानुसार तीन महिन्याचे धान्य मोफत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com