
धाराशिव : तालुक्यातील येडशीच्या वनामध्ये आढळून आलेल्या वाघाच्या हालचालीवर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले जात आहे. यासाठी जवळपास १८ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाघ आढळून आला होता. त्यानंतर तो पुन्हा आढळलेला नाही.