esakal | latur : मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

latur

मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेले मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याचा येवा सातत्याने वाढत असल्याने मंगळवारी (ता. २८) धरणाचे सर्व १८ दरवाजे सव्वा ते तीन मीटरने उघडून ७० हजार ८४५ क्युसेकने पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. धरणाच्या ४२ वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. मांजरा नदीला महापूर आला आहे. नदीकाठच्या गावांतील पिके पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे.

मांजरा धरणातून लातूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. लातूर एमआयडीसी, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही गावांनाही पाणी पुरवठा होतो. १९८० पासून धरणात पाणी साठवले जात आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस पडत नसल्याने सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पण तीन चार वर्षाच्या सायकलनंतर मात्र धरण भरत आहे. यंदा हे धरण पूर्ण भरले. आतापर्यंत सहा दरवाजे उघडून पाणी नदीत सोडले जात होते. पण आज सर्व १८ दरवाजे उघडण्याची वेळ आली. त्यामुळे १४५ किलोमीटर मांजरा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

यापूर्वीची स्थिती

मांजरा धरणात पाणी साठवण्यास सुरवात झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे ४२ वर्षात तिसऱ्यांदा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. यात १९८९ त्यानंतर २००५ व आता २०२१ मध्ये धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्या १६ वर्षात पहिल्यांदाच सर्व दरवाजे उघडून विसर्ग करावा लागला आहे.

loading image
go to top