
छत्रपती संभाजीनगर : अपहरण आणि अपघाताचा भयंकर अनुभव घेऊन १८ तासांनी घरी परतलेल्या चिमुकल्या चैतन्यने आईला पाहताच घट्ट मिठी मारली आणि आईच्या जिवात जीव आला. कुशीत शिरलेल्या चैतन्यच्या डोक्यावरून हात फिरवत आईने ‘काळजी करू नकोस, मी आहे... तू जेवलास का?’ असे विचारले आणि तोपर्यंत मोठ्या धीराने शहाण्या मुलासारखा वागणाऱ्या चैतन्यला भावना अनावर झाल्या. तो हमसून हमसून रडू लागला. माय-लेकाच्या या भेटीने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच डोळ्यांत आपसूकच पाणी आले.