
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने १८६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मानस आहे, असे परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. १७) सांगितले.