
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या १८७ महाविद्यालयांची तपासणी पूर्ण केली. सकारात्मक आणि नकारात्मक शिफारशी असलेल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमनिहाय यादी बुधवारी (ता. २३) जाहीर केली. त्यात कसल्याही सुविधा नसलेल्या ‘टपरीछाप’सोबत ‘बड्या’ महाविद्यालयांचेही प्रवेश रोखले आहेत. २८ जुलैपर्यंत त्रुटीपूर्ततेची संधी असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.