
परळी वैजनाथ : येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाच्या घटनेला १९ महिने उलटले तरी संशयितांना अटक झाली नाही. याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, संशयितांना तत्काळ अटक करावी या मागण्यांसाठी कन्हेरवाडी व भोपळा (ता. परळी वैजनाथ) येथील ग्रामस्थांतर्फे शुक्रवारी (ता.२५) सकाळी अकराला परळी- अंबाजोगाई मार्गावरील कन्हेरवाडी येथे चार तास रास्ता रोको आंदोलन केले.