Hingoli News : कळमनुरी तालुक्यात दुर्दैवी घटना; विजेचा धक्का आणि मृत्यू
Electric Shock : हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याचीवाडी येथे शेतात विजेच्या तारेचा शॉक लागून एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघा शेतमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी (जि.हिंगोली) : शेतात विजेचा प्रवाह असलेल्या तारेस चिटकून वीस वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २०) तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन शेतमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.