Vishal Manal
sakal
गंगापूर - वाहेगाव येथील विशाल भरत मनाळ (वय-22) याने मंगळवारी (ता. 2) रोजी रात्री शेतातील घराजवळ टोकाचे पाऊल उचलले. अडीच एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या भरत मनाळ यांच्या घरात गेल्या वर्षी मुलीच्या लग्नानंतर आर्थिक ताण वाढला होता. याच तणावातून विशालने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.