Beed News: बावीस वर्षांच्या संसारानंतर दोन लाखांसाठी पत्नीचा छळ
Domestic Violence: बीडमध्ये लग्नाला २२ वर्षे होऊनही महिलेला पतीकडून माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ सहन करून अखेर पीडितेने नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बीड : बावीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर ‘माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये’ म्हणत पतीने पत्नीचा छळ केला. पत्नीने याबाबत नेकनूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.