esakal | परभणीत २२७ जणांना घराबाहेर पडणे पडले महागात 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी शहर व परिसरातदेखील कोरोनाचा धोका वाढलेला आहे. असे असतानाही अनेक नागरिकांना नागरिक अद्यापही बेजबाबदारपणे वागत असून नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे.

परभणीत २२७ जणांना घराबाहेर पडणे पडले महागात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी जिल्ह्यात परिसरात कोरोना विषाणूचा धोका वाढलेला असतानाही नागरिकांमध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून येते. गुरुवारी (ता.३०) देखील नियमभंग करणाऱ्या २२७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
परभणी शहरात कोरोना बाधीत आढळून आलेल्या रुग्णाचे पुढील दोन अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त झाला होता. पण, त्यातच सेलू (जि.परभणी) येथील एका महिलेला नांदेड येथे कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. सदरील महिला नांदेड येथे जात असताना परभणी येथील एका रुग्णालयात दोन तास थांबली होती. तेथील अनेकांना आता क्वारंटाईन  करण्यात आलेले असून तो परिसर देखील सीलबंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहर व परिसरात देखील कोरोनाचा धोका वाढलेला आहे. असे असतानाही अनेक नागरिकांना नागरिक अद्यापही बेजबाबदारपणे वागत असून नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - या’ जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ कामांना सुरवात

 संस्‍था अथवा समूह यांच्यावर कारवाई
महापालिकेने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपापयोजनेचे पालन न करता गैरकृत्‍य करणाऱ्या व्‍यक्ती, संस्‍था अथवा समूह यांचेवर कारवाई सुरू केलेली आहे गुरुवारी (ता. ३०) एकूण २२७ जनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३३ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे. मास्‍कचा वापरन करणे करावा, अत्‍यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे, सामाजिक अंतर न राखणे, किराणा सामानाचे दरपत्रक न लावणे आदी कारणासाठी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना

दुसऱ्यांदा आढळून आल्यास गुन्हा दाखल
दुसऱ्यांदा आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, शिवाजी सरनाईक, मुक्तसिदखान यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुरा शेख शादाब, नयनरत्न घुगे, विकास रत्नपारखी, विनय ठाकूर आदीनी यासाठी पुढाकार घेतला.
.

loading image
go to top