Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

कत्तलीच्या उद्देशाने आयशर बॉडीबंद वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेल्या २३ बैलांसह आयशर वाहन पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी जप्त करून वाहनचालकास केली अटक.
23 Cattle Rescued from Slaughter by Pachod Police Eicher Truck

23 Cattle Rescued from Slaughter by Pachod Police Eicher Truck

sakal

Updated on: 

पाचोड - कत्तलीच्या उद्देशाने आयशर बॉडीबंद वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेल्या २३ बैलांसह आयशर वाहन पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी जप्त करून वाहनचालकास अटक केली. ही कारवाई रजापूर (ता.पैठण) शिवारात गुरुवारी (ता.२९) रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईत १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे २३ बैल आणि १२ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, असा एकूण २४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाहनमालकासह अन्य दोन साथीदार फरार आहेत.

Loading content, please wait...