
या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्याना कोणता आजार झाला यांचा निष्कर्ष माहित नसल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे दोन दिवसात ३४ पैकी २४ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे.
या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्याना कोणता आजार झाला यांचा निष्कर्ष माहित नसल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित केला आहे. या साठी दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. जावळे यांनी गावात जाऊन पाहणी केली. तसेच मृत्यू मुखी पडलेल्या कोंबड्यांचे सॅम्पल भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्या रोगाचे निदान स्पस्ट होईल असे डॉ. जावळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रभावित ठिकाणी वाहनांच्या येजा करण्यास दहा किलोमीटर मनाई केली आहे.तसेच खबरदारी म्हणून या क्षेत्रात जिवंत व मृत कोंबड्या,अंडी,पक्षी खाद्य नेण्यास प्रतिबंध घातले आहेत. हा परिसर निर्जंतुकीकरण करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे
|