फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.
कर्जबाजारीपणाचा वाढता ताण आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे हताश होऊन त्याने धानोरा रस्त्यावरील परिसरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोपीनाथ तेजराव कोलते (वय २९) रा. टाकळी कोलते, ता.फुलंब्री असे आत्महत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.