
लातूर : जन्म दाखल्याचा कोणताही पुरावा न घेता ३ हजार ५६ बांगलादेशींना जन्म दाखले दिले. त्यांची चार दिवसांत चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या सर्व प्रकरणांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे दिली.