esakal | हिंगोली मतदारसंघातील ३१२ कि.मी रस्त्याचा प्रस्ताव- खासदार हेमंत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रामधील एकूण ३१२ किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी करणारा प्रस्ताव खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे .

हिंगोली मतदारसंघातील ३१२ कि.मी रस्त्याचा प्रस्ताव- खासदार हेमंत पाटील 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंर्तर्गत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रामधील एकूण ३१२ किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी करणारा प्रस्ताव खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी जिल्ह्यांतर्गत व प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांमुळे दळणवळणाची चांगली सुविधा होणार आहे. 

मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळयांसमोर ठेवून खासदार हेमंत पाटील अविरतपणे कार्य करत असून मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व कच्चे रस्ते मजबुतीकरन करून मुख्य रस्त्यांना जोडण्याच्या उद्देशाने मतदार संघातील सहा विधानसभा निहाय असलेल्या ३१२ किलोमीटरच्या प्रस्तावित रस्त्यांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. हिंगोली मतदार संघात हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांच्या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग १६१ ते समगा- दुर्गधामणी ११ कि.मी, देऊळगाव (रामा) -वरुड (गवळी )- बेलेवाडी ते हिंगोली १० कि.मी, इडोळी-अमला-काळकोंडी रस्ता ८.५० कि.मी, आडगाव-बेलुरा-माळहिवरा रस्ता १०.५० कि.मी , कारवाडी-पिंपरखुटा ५ कि.मी असे एकूण ४५ कि.मी.चे रस्ते. 

हेही वाचा -  बापरे : नांदेड जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची एवढी संख्या...?

सोनगाव तालुक्यातील रस्त्याचे भाग्य उजळणार

सेनगाव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग २६ ते कौठा रस्ता ३ कि.मी, राज्यमार्ग २४८ ते सिनगी-नागा- कारेगाव-शिवणी(खु)-पळशी १०कि.मी, पानकन्हेरगाव-खैरखेडा रस्ता ५.५० कि.मी, आजेगाव-ताकतोडा रस्ता १४ कि.मी, ३२ कि.मीचे रस्ते. कळमनुरीमधील राज्यमार्ग २५६ ते सिंदगी-जांब- माळधावंडा- बोथी- येडशी-कुंभारवाडी ते राष्ट्रीय महामार्ग १६१ पर्यंत १४ कि.मी प्रमुख जिल्हामार्ग ०७ ते वाई-तरोडा-वाकोडी-ते राज्य मार्ग २५७ पर्यंत रस्ता १२ कि.मी राष्ट्रीय महामार्ग १६१ ते सांडस- सालेगाव ते राज्यमार्ग २५७ पर्यंत रस्ता ७ कि.मी राष्ट्रीय महामार्ग १६१ ते आसोलवाडी-मुंडळ -सोनोडी -मोरगव्हाण रस्ता ९ कि. मी राष्ट्रीय महामार्ग १६१ ते दाती-कान्हेगाव-देवजना रस्ता ८ कि.मी असे एकूण ५१ कि.मीचे रस्ते, तर वसमत तालुक्यामधील प्रमुख जिल्हामार्ग १२ ते पार्डी बु. खाजमापूर गिरगांव ते रेडगाव रस्ता ११.३०कि. मी गिरगाव ते देळुब जिल्हा सरहद्दीपर्यंत ७.कि.मी, राष्ट्रीय महामार्ग १६१ ते गणेशपूर- थोरावा- कागबन-सारोळा ते हयातनगर जवळा (बु .)ते जिल्हा सरहद्द (आहेरवाडीकडे  )१०कि.मी, राज्यमार्ग २५६ ते कृष्ण मंदिर किनोळा-खुदनापूर -सोमठाणा -पार्डी (बु.) रस्ता ७.कि.मी असे एकूण ३६.५० कि.मी,चे रस्ते.

एकूण ३१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश

औंढा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ते हिवरखेडा-उंडेगाव-चिंचोली-निळोबा-जलालपूर-बेरुळा ५. कि.मी,चिंचोली-निळोबा ते पेरजाबाद रस्ता ५ कि.मी , राज्यमार्ग २४९ते जवळा बाजार-आजारसोंडा-तपोवन रस्ता ५ कि.मी,प्रमुख जिल्हामार्ग २१ ते ढेगज -वडचुना ते प्रमुख जिल्हामार्ग (२२) ८ कि.मी  रस्ता असे एकूण २३.५० कि.मी चे रस्ते आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर आणि हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील ६५ कि.मी तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव विधानसभा मतदार संघातील मुडाणा-वडद ८ कि.मी, महागाव-उटी-कोठारी ८.५५ कि.मी, ढाणकी-गांजेगाव-कोपरा २६ कि.मी, टाकळी-तिवडी १६.९०कि.मी, असे एकूण ३१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश असून खासदार हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केले आहेत .

संपादन - प्रल्हाद कांबळे