Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधेची शक्यता; २७ मुले, ५ मुलीं उपजिल्हा रुग्णालयात दाखल

हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना रविवारी (ता. ९) सायंकाळच्या जेवणानंतर मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.
Food Poisoning

Food Poisoning

sakal

Updated on

देगलूर - तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना रविवारी (ता. ९) सायंकाळच्या जेवणानंतर मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत असून, सर्व विद्यार्थ्यांना तातडीने देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com