
Beed Flood
sakal
गेवराई : रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरी आणि सिंदफणा नदीने उग्र रुप धारण केल्यामुळे परिसरात पूरग्रस्त परिस्थिती गंभीर बनली आहे.बीडमधील हिंगणी हवेली गावाला पूराने वेढले असल्याने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित याठिकाणी दाखल होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूरपरिस्थितीचा फोनवर माहीती दिली.