(व्हिडीओ पहा) आरटीओमुळे परभणीत 350 शालेय वाहने बंद

school vehicles Strike parbhani News
school vehicles Strike parbhani News
Updated on

परभणी : विद्यार्थांना ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी बुधवारी (11) पून्हा बंद पुकारला. शहरातील जवळपास 350 ऑटोचालकांनी आज बंद पुकारून त्यांची वाहतुक बंद ठेवली. आरटीओ प्रशासनाच्या कारवाई विरोधात त्यांनी हा बंद पुकारला आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या या बंद मुळे सकाळपासून विद्यार्थांची शाळेत जाण्याची गडबड घाई दिसून येत होती.


शहरात विद्यार्थांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनावर मागील काही दिवसापासून कारवाई सुरु आहे. 7 प्लस 1 या वाहनांना स्कुल परमिट असतांनाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यत 300 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी देखील या वाहनधारकांनी बंद
पुकारून कारवाईचा निषेध केला होता. परत मंगळवारी (ता.10) आरटीओंच्यावतीने या ऑटोरिक्षावर कारवाई करण्यात आली. मंगळवारी (ता.10) जवळपास 50 गाड्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर 25 गाड्यां जप्त करण्यात आल्याची माहिती ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिली. त्यामुळे बुधवारी (ता.11) सकाळपासून या ऑटोरिक्षा चालकांनी बंद पाळण्यास सुरुवात केली. हा बंद बेमुदत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

पालक - विद्यार्थांची धावपळ
ऑटोरिक्षा संघटनेच्यावतीने बंद पुकारण्यात आल्याने सकाळच्या थंडीत पालकांची व त्यांच्या पाल्यांची धावपळ होतांना दिसत होती. शहरातील बहुतांश शाळांनी रात्री उशिरा निरोप दिल्याने पालकांना सकाळ थंडीतच घराबाहेर पडून शाळा गाठाव्या लागल्या. काहींनी तर त्यांच्या पाल्यांना शाळेला सुट्टी दिली. काही एकत्रीत राहणाऱ्या कुटूंबात चार ते पाच मुले असल्याने पालकांची या मुलांना गाडीवर नेऊन सोडण्याची कसरत होत होती.

आरटीओंच्यावतीने आमच्यावर केली जाणारी कारवाई त्वरीत थांबविण्यात यावी. तसेच आमच्या संघटनेला पुन्हा कारवाई होणार नाही हे लेखी द्यावे असे केल्यास बंद मागे घेतला जाईल. अन्यथा आम्ही बेमुदत बंद पाळणार आहोत.
- संतोष ठाकूर, अध्यक्ष, ऑटोरिक्षा संघटना, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com