esakal | सैन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ३६ लाखाचा गंडा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कंधार तालुक्यातील आठ बेरोजगारांना तब्बल ३६ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी माजी सैनिकाच्या तक्रारीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा.

सैन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ३६ लाखाचा गंडा 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आसाम रायफलमध्ये सैन्याची नोकरी लावतो असे म्हणून कंधार तालुक्यातील आठ बेरोजगारांना तब्बल ३६ लाखाचा गंडा घातला. या प्रकरणी माजी सैनिकाच्या तक्रारीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता. २२) दाखल करण्यात आला आहे.
 
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील माजी सैनिक भिमराव किशनराव नागरगोजे (वय ४९) यांची आरोपींतानी ओळख करुन घेतली. माझे आसाम रायफलमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत. असे सांगुन विश्‍वासात घेतले. तुमचा मुलगा सचीन याला मी आसाम रायफलमध्ये नोकरी लावतो असे म्हणून त्यांच्याकडून आरोपी महेश रमेश कदम याने चार लाख रुपये घेतले. त्यानंतर बनावट आॅर्डर तयार करुन त्यांना दिला. 

हेही वाचा -  Video-पुस्तक दिन : जाणून घ्या वाचनाचं महत्त्व

कंधार तालुक्यातील ‘या’ बेरोजगारांना गंडा

दरम्यानच्या काळात त्याने पुन्हा तुमचे काही ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही लवकर सांगा. जागा कमी राहिल्या आहेत. मुलाचा आॅर्डर बघितल्याने माजी सैनिक असलेल्या भिमरालव नागरगोजे यांचा विश्‍वास बसला. त्यांनी आपल्या ओळखीच्या काही मित्रांना सांगितले. यावरून व्यंकटेश रंगनाथ रामनबैनवाड रा. हाडोळी (ज), मारोती दशरथ केंद्रे रा. रमनेवाडी, अमोल भास्कर नागरगोजे रा. घुगेवाडी ता. लोहा, बाबू शिवराम टोकलवाड रा. गवुळ ता. कंधार, नामदेव मारोती हेंडगे रा. गवुळ, संदीप शिवाजी पंदेवाड रा. गवुळ, नामदेव त्र्यंबक रंगवाड रा. गवूळ आणि गोविंद माधव घुगे रा. घागरदरा ता. कंधार यांनीही पैसे दिले. या सर्वानी ३६ लाख रुपये दिले. या सर्वांना बनावट आॅर्डर दिले.

मुख्यालयी गेल्यानंतर हे आॅर्डर बनावट असल्याचे समजले

हे आॅर्डर घेऊन सर्वजन आसाम रायफलच्या मुख्यालयी गेल्यानंतर हे आॅर्डर बनावट असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कुठल्याही भरतीची जाहिरात आमच्याकडून करण्यात आली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच हे सर्व बेरोजगार आपली गावी परत आले. हा प्रकार ता. सात सप्टेंबर २०१७ ते ता. १८ जूलै २०१८ दरम्यान घडला.

येथे क्लिक करा - चांदण्याच्या प्रकाशात या विभागाची सेवा

माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी महेश कदम याला पैशाची मागणी केली. त्याने आजपर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे देण्यास नकार दिल्याने माजी सैनिक भिमराव नागरगोजे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन महेश रमश कदम, रमेश कदम, रेखा रमेश कदम आणि श्रीमती नागापूरकर यांच्याविद्ध फसवणुकीसह आदी कलम्नावये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. केंद्रे करत आहेत.