परभणी अन्न व औषध विभागाकडून 40 तपासण्या, 80 नमुने घेतले तपासणीसाठी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दसरा, ईद व दीपावलीनिमित्य ही विशेष मोहिम अन्न व औषध प्रशासन परभणी मार्फत घेण्यात आली आहे. या मोहिमेत दुध, खाद्यतेल, तूप, रवा, मैदा, मावा, तूर डाळ, स्विट खाद्यपदार्थ, फरसाण व इतर खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवू विश्लेषणास्तव पाठविण्यात आले आहेत

परभणी अन्न व औषध विभागाकडून 40 तपासण्या, 80 नमुने घेतले तपासणीसाठी 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः येथील अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सणासुदीच्या काळात अन्नातून विषबाधे सारखे प्रकार घडू नयेत यासाठी 80 पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे 80 नमुने विश्लेषणासाठी घेवून ते अन्न विश्लेषक यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अन्न नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

दसरा, ईद व दीपावलीनिमित्य ही विशेष मोहिम अन्न व औषध प्रशासन परभणी मार्फत घेण्यात आली आहे. या मोहिमेत दुध, खाद्यतेल, तूप, रवा, मैदा, मावा, तूर डाळ, स्विट खाद्यपदार्थ, फरसाण व इतर खाद्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवू विश्लेषणास्तव पाठविण्यात आले आहेत. एकूण 80 अन्न नमुन्यामध्ये दुधाचे 11 नमुने, खाद्यतेलाचे 14, रवा, मैदाचे 8 नमुने, खवाचे 4, तुपाचे 8, डाळीचे 5, स्विट अन्नपदार्थांचे 8, फरसान अन्न पदार्थांचे 7 तर इतर अन्नपदार्थांचे 15 असे 80 अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

ता. 12 व 13 नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र यांच्या मार्फत दुग्धजन्य पदार्थांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयातून 5 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. या मोहिमेतंर्गत दुध्दजन्य अन्न पदार्थांचे सूक्ष्मजीव तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. सूक्ष्मजीव विरहित वातावरणात हे अन्न नमुने तपासणीसाठी घेवून अतिशय कमी तापमानात हे नमुने विश्लेषणास्तव पाठविण्यात येणार आहेत. ही मोहिम अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे, अरूण तमडवार, अनुराधा भोसले यांच्या पथकाने राबविली आहे.

हेही वाचाविशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

सणासुदीच्या काळात जर कुणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व नियम व नियमन 2011 चे जर कुणीही उल्लंघन करत असेल तर त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन परभणी मार्फत दरवर्षी विशेष मोहिम राबविण्यात येत असते. या वर्षीसुध्दा विशेष मोहिम राबवून 80 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

- नारायण सरकटे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पऱभणी

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image
go to top