हिंगोलीत ४२ पोलिसांना पदोन्नती, पोलिस दलात आनंदाचे वातावरण

राजेश दारव्हेकर
Friday, 1 January 2021

सरत्या वर्षाच्या शेवटी ता. ३१ डिसेंबरला जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांना नववर्षाची पदोत्रतीची भेट मिळाली आहे

हिंगोली : जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांच्या पदोन्नतीबद्दल ता. ३१ डिसेंबरला आदेश  काढण्यात आले असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक ( गृह ) सरदारसिंह ठाकुर, पोलिस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची उपस्थिती होती.

सरत्या वर्षाच्या शेवटी ता. ३१ डिसेंबरला जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांना नववर्षाची पदोत्रतीची भेट मिळाली आहे. यामध्ये दहा पोलिस हवालदारांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यात रमेश व्यंकट सोनटक्के ( हट्टा) , मो. युनूस मो. सिद्दीकी शेख ( बासंबा ),
नारायण मस्के ( वसमत शहर ), आनंदा वाळके ( कुरुंदा ), अरविंद राठोड,  प्रकाश  शिंदे ( पोलिस मुख्यालय हिंगोली ), विजय बोहाडे, खिजर पाशा ख्वाजा, शेख इस्माईल, ( औंढा नागनाथ ), बालकृष्ण शिंदे ( मोटार परीवहन विभाग हिंगोली ), बापुराव राठोड यांचा समावेश आहे. 

हेही वाचा नांदेड : दोन लाख 69 हजार वीजग्राहकांनी केली 48 कोटी 53 लाख रूपयांची वीजबिले जमा -

बारा पोलिस नाईकची हवालदारपदी पदोन्नती झाली. 

ज्यामध्ये रोहिदास राठोड ( कळमनुरी ), सुनिता शिंदे ( महिला दक्षता समिती ), ज्योती जोंधळे, ग्यानदेव घुगे, शेख शकील शेख ( हिंगोली शहर ), राहूलआप्पा गोटरे ( गोरेगाव ), थायरा राठोड, माधव सूर्यवंशी ( औंढा नागनाथ ), बाबुराव पाईकराव ( मोटार परीवहन विभाग हिंगोली ), रामराव  जाधव, उत्तम कांबळे, बालासाहेब  खलसे, गजानन देशमुख ( पोलिस मुख्यालय ), रविंद्र धाबे ( एटीएस ), फुलाजी सावळे ( शहर वाहतूक शाखा हिंगोली ), सखाराम गजभार ( नर्सी नामदेव ).
 
१६ चालक पोलिस शिपाई, महिला पोलिस शिपायांची पोलिस नाईक पदावर पदोन्नती झाली.

ज्यामध्ये गोरखनाथ चव्हाण ( मोटार परीवहन विभाग हिंगोली ), दत्तात्रय कावरखे ( हट्टा ), अफरोज खान ( पोलिस मुख्यालय हिंगोली ), विजया कुलकर्णी ( एसआयटी ), सुरेखा कल्याणकर ( हिंगोली शहर ), प्रभाकर शेट्टे ( श्वान पथक हिंगोली ), गजानन शिंदे ( सेनगाव ), अर्चना वाघमारे ( वसमत ग्रामीण ), वंदना जुमडे, बळीराम साळवे ( गोरेगाव ), शेख मोहंमद ( हिंगोली ग्रामीण ), निलेश मंगरुळकर ( पोलिस मुख्यालय हिंगोली ), शेख समी शेख समद ( आ. बाळापूर ), निरंजन नलवार ( कळमनुरी ), गजानन देशमुख ( हिंगोली शहर ), कैलास सातव ( कळमनुरी ) या ४२ पोलिसांचा समावेश आहे. 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 policemen promoted in Hingoli, happy atmosphere in police force hingoli news