

Gangapur's Grand Wari: 1,200 Devotees Embark on 300-km Pilgrimage to Pandharpur
sakal
-जमील पठाण
कायगाव : आषाढी एकादशी निमित्त गंगापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमचे वारकरी मंगळवारी (ता.7) सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. गाथामूर्ती मठाधिपती रामभाऊ महाराज राऊत यांच्या नेतृत्वाखाली 43 वर्षांची ही अखंड परंपरा यंदाही भक्तिभावात सुरू झाली.या दिंडीचे रस्त्याने ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.