टंचाइ निवारण्यासाठी ‘एवढ्या’ कोटींचा आराखडा

file photo
file photo

नांदेड : आगामी काळात ग्रामीण भागासह नागरी भागात नागरिकांना टंचाइच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी सोळा तालुक्याने ४३ कोटी १५ लाख तर नागरी भागातुन एक कोटी दोन लाख असे एकूण ४४ कोटींचा टंचाइ आराखडा तयार केला आहे. हा आराखडात जिल्हा प्रशासनाने नुकताच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

टंचाइ आरखडे सादर
मार्च महिन्याची चाहूल लागताच जिल्ह्याला टंचाइच्या झळा जानवु लागतात. याबाबत तालुकानिहाय नियोजन करुन ते शासनाला सादर केले जाते. यंदाही सर्वच तालुक्यांना ता. दहा फेब्रुवारीपर्यंत टंचाइच्या खर्चाबाबत नियोजन करुन प्रशासनाला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विभागीय आयुक्तांना आराखडे सादर
जिल्ह्यातील सोळा तालुक्यांचे टंचाइ आराखडे जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर ता. १३ फेब्रुवारी रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. हा टंचाइ आराखडा विभागीय आयुक्तांकडून राज्य शासनाला पाठविण्यात आल्यानंतर टंचाइतंर्गत खर्चाला शासनाकडून मान्यता मिळते, असे सूत्रांनी सांगितले. 

पाच प्रकारच्या उपाययोजना
यंदा टंचाइच्या कामात नवीन विंधन विहीरी घेणे, नळ दुरुस्ती विशेष योजना, तात्पुरती पुरक नळ योजना, विंधन विहीर दुरुस्ती, खासगी विहीर व कुपनलीका अधिगृहण तसेच टॅँकरने पाणीपुरवठा करणे या बाबींचा सामावेश आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत ३४ कोटी ८६ हजार तर एप्रिल ते जून पर्यंत नऊ कोटी १४ लाख असे एकूण ४३ कोटी १५ लाख ग्रामीण भागासाठी तर नागरी भागासाठी एक कोटी दोन लाख रुपयांचा आराखडा सादर केला आहे.

मागीलवर्षी १६१ टॅंकरने पाणीपुरवठा
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नांदेड, देगलूर, नायगाव या तालुक्यांसह नांदेड, अर्धापूर व लोहा शहरात टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. यात टंचाइच्या वेगवेगळ्या उपाययोजनावर ३४ कोटींचा खर्च झाला होता. यात ग्रामीण व नागरी भागात एकूण १६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या अधीक म्हणजेच १०६ टक्यांनुसार एक हजार १३ मिलीमीटर झाल्यामुळे यंदा टंचाइवर अधीक खर्च होणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय सादर केलेला टंचाइ आराखडा
(रक्कम लाखात)
नांदेड - २.७५, अर्धापूर - १०५.७२, मुदखेड - १२८.३४, भोकर - २१४.९८, उमरी - १७८.०४, हदगाव - ३०३.५२, हिमायतनगर - १५३.९४, बिलोली - २७४.६४, धर्माबाद - ११०.८२, नायगाव - ५०९.१६, देगलूर - १०३.२, मुखेड - ६७८.७, कंधार - ४०८.६२, लोहा - ४००.७, किनवट - ३१६.२६ व माहूर - १६३.५६.

टॅंकर संख्या कमी करण्याचा प्रयत्न
आगामी काळात जिल्ह्याचा दौरा करुन टंचाइचा आढावा घेणार आहे. मागे ज्या ठिकाणी टॅंकर लागले त्या ठिकाणी यंदा टॅंकर लागणार नाहीत यासाठी नियोजन करण्यात येइल. मागीलवर्षी उशिराने पाऊस झाला. तसेच ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आहे. जमिनीमध्येही जलसंचय वाढल्याने यावर्षी अधीक टंचाइ जानवणार नाही. 

डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com