Kannad News : कन्नडमध्ये ४४ वर्षीय विवाहितेचा मुत्यु! पतीला पोलीसांकडुन अटक; चारित्र्याच्या संशयातून वाद झाल्याचा फिर्यादीचा आरोप

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास रोहिणी यांच्या डोक्याला व तोंडाला लाकडी दांड्याने मारहाण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
rohini kumbhkarn

rohini kumbhkarn

sakal

Updated on: 

कन्नड - शहरातील गजानन कॉलनी परिसरात रोहिणी मुकेश कुंभकर्ण (वय ४४) यांचा सोमवारी (ता. १२) पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला. पतीने डोक्यात व तोंडावर लाकडी दांड्याने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पती मुकेश बाळकडू कुंभकर्ण याच्याविरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com