
शिरूर कासार : मच्छिंद्रगडाचा ४७ वा वार्षिक फिरता नारळी सप्ताह मच्छिंद्रगडाचे मठाधिपती महंत जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला. बुधवारी (ता. दोन) नांदेवाली येथे हजारो भाविक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी सोहळ्याने या पवित्र सप्ताहाची सुरवात झाली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला, तर ग्रामस्थांनी ब्रह्मवृंद आणि साधू-संतांचे जल्लोषात स्वागत केले.