esakal | वसमतमध्ये ५० बेड व ऑक्सिजनची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी 

बोलून बातमी शोधा

file photo

वसमत शहरातील कोविड सेंटरमध्ये अतिरिक्त १०० बेड व ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी. शिवसेना शिष्टमंडळ व नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांनी घेतली जिल्ह्याधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट

वसमतमध्ये ५० बेड व ऑक्सिजनची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी 
sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली )  : वसमत शहरातील कोविड सेंटरमध्ये अतिरिक्त १०० बेड व ऑक्सिजनची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा शल्यचिकित्सक श्री सुर्यवंशी यांना गुरुवारी ( ता. आठ) रोजी शिवसेना शिष्टमंडळ व नगराध्यक्ष निवास पोराजवार यांनी प्रत्यक्ष भेटून दिले. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर असून ५० बेडची व्यवस्था आहे. परंतू मागील पंधरा ते वीस दिवसांपासून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालयातही बेडची कमतरता भासत आहे. परिणामी रुग्णांना नांदेड, परभणी येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यामध्ये रुग्णांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत आहे. या पार्श्वभूमीवर वसमत येथील शिवसेनेचे शिष्टमंडळ व नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवळ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेतली.

हेही वाचातलवारीने सपासप वार करुन एकाचा खून

यावेळी जिल्हाधिकाऱी यांनी ५० बेड लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच  ज्या खाजगी डाॅक्टर यांनी वसमत शहरामध्ये खाजगी कोविड सेंटर्सना परवानगीसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांना लवकर परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच वसमत शहरातील रुग्णांसाठी रेमडिसवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रयत्न करणार असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक काशिनाथ पाटील भोसले, नगरसेवक दिलीप भोसले पाटील, नगरसेवक धनंजय गोरे व माजी शहरप्रमुख मनोज चव्हाण आदींची उपस्थित होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे