Beed Accident : रस्त्याच्या कडेला बसलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीला वाहनाने दिला धक्का, जागीच मृत्यू
Vehicle Hit : माजलगावमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीला रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत वाहनाच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी साडेचारच्या सुमारास दबडगावकर कॉलनी येथे घडली.
माजलगाव: तालुक्यातील मनुरवाडी येथील रहिवासी असलेला ५० वर्षीय व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेला असताना एका वाहनातील चालकाने त्यास ढकलले असता तो व्यक्ती जागीच मृत पावला. ही घटना शुक्रवारी (ता. ४) साडेचारच्या सुमारास दबडगावकर कॉलनी या ठिकाणी घडली.