
छत्रपती संभाजीनगर: गेल्या सात महिन्यांत मराठवाड्यात ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ३३९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे आर्थिक मदत देण्यास पात्र आहेत. सर्वाधिक १३६ आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ शेतकरी आत्महत्या झाल्या. मार्चमध्ये ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे.