Dr Babasaheb Ambedkar UniversitySakal
मराठवाडा
Dr Babasaheb Ambedkar University : ५६ हजार विद्यार्थ्यांच्या पदवी अनुग्रहाला मान्यता; संलग्नीकरण, नूतनीकरणाचे ४६७ प्रस्ताव
Degree Awards : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात २०२३ आणि २०२४ मधील पदवी, पदविका, पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या ५५,९८६ विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ता. २२ फेब्रुवारीला होणाऱ्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३, मार्च-एप्रिल २०२४ मधील सर्व पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तीर्ण तसेच एम.फिल. व पीएच.डी. पदवीस पात्र विद्यार्थ्यांसाठी ५५ हजार ९८६ पदव्यांच्या अनुग्रहाला विद्या परिषदेने मान्यता दिली, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

